Tuesday, December 1, 2009

mi mi aani mi

कॉलेज लाइफ़ माझं "कँटीन मधला चहा आणिचहा सोबत वडा पावपैसे कुठ्ले खिशात तेव्हाउधारीचचं खातं राव !
कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवूनआणि पोरींची चेष्टा करणंदिसलीच एखादी चांगली तरतिला लांबूनच बघून झुरणं !
बसलोच चुकून लेक्चरला तरशेवटचा बाक ठरलेलाकुणाच्या तरी वहीतलं पानंआणि पेन सुध्दा चोरलेला !
परिक्षा जवळ आलीकि मात्र रात्री जागायच्याडोळ्यात स्वप्नं उद्याचीम्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !
पूर्ण व्हायचं एक वर्तुळएक वर्ष सरायचंपुन्हा नव्या पाखरांसोबतजुनं झाड भरायचं.
अशी वर्तुळ भरता भरता कळलंअरे कागदच भरला !वर्तुळ झाल्या कागदालाफ़क्त सलाम करायचा उरला !!
पुन्हा नविन रस्तापुन्हा नविन साथीजुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्याफ़क्त आठवणीच हाती !!!!!!